समाजसंत गाडगे बाबा हे द्रष्टे समाजसुधारक. - प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे
अमरदीप लोखंडे,सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,२१/१२/२३ " संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील अतिशय महत्त्वाचे समाजसंत होते.गाडगे बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजमन जागृत करण्यासाठी देह झिजविला.स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन,बुवाबाजी, हुंडाबळी याविरुद्ध ते शब्दांचे आसूड ओढत,समाजसंत गाडगे बाबा हे ख-या अर्थाने द्रष्टे समाजसुधारक होते " असे मौलिक विचार प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी व्यक्त केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात संत गाडगे बाबा पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते.
सर्वप्रथम संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ.डी. एच.गहाणे,उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यानंतर उपस्थित अधीक्षक संगीता ठाकरे,पर्यवेक्षक प्रा.आनंद भोयर,डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ तात्या गेडाम, डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर,
डॉ मोहन कापगते, डॉ युवराज मेश्राम, भास्कर लेनगुरे, डॉ रतन मेश्राम,डॉ युवराज मेश्राम,डाॅ सुनिल चौधरी,डॉ किशोर नाकतोडे, डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे,डॉ योगेश ठावरी, डॉ वर्षा चंदनशिवे , डॉ अरविंद मुंगोले,,प्रा अजय खोब्रागडे, डॉ दुपारे,प्रा लेनगुरे मॅडम,रोशन डांगे,रुपेश चामलाटे, दत्तू भागडकर,खेमराज निनावे, इ.मान्यवरांनी पुष्पगुच्छ वाहून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार समिती प्रभारी डॉ कुलजित शर्मांनी केले.यशस्वीतेसाठी डॉ खानोरकर, डॉ मेश्राम,प्रा.धिरज आतला,जगदिश गुरनुलेंनी सहकार्य केले.

