भुतीनाला वडसा - ब्रम्हपुरी रोड साठी ठिय्या आंदोलन आज.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
ब्रम्हपुरी : वडसा रोड वरील भुती नाला येथे नव्याने सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामात कामात दिरंगाई केल्याने भर पावसात नागरिकांना विद्यार्थ्यांना होत असलेला कमालीचा त्रास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीसाठी सबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी तसेच सबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करून लवकरात लवकर ब्रम्हपुरी वडसा रोड वरील भूती नाल्यावर उपाय योजना करण्यात यावे.
या मागणीसाठी कॉम्रेड विनोद झोडगे पाटील तसेच रिपब्लिकन युवा नेते प्रशांत डांगे यांच्या नेतृत्वात दिनांक १३ जुलै २०२४ रोज शनिवारला सकाळी ११ ते ५.०० वाजे पर्यंत चक्का जाम व ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.
तरी ब्रम्हपुरी वडसा येथील नागरिकांना तसेच त्या रोड वरील गावातील नागरिकांना विनंती आहे की. सदर आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलक विनोद झोडगे पाटील व प्रशांत डांगे यांनी केले आहे.
या आंदोलनाची पूर्व सूचना आणि सबंधित कंत्राटदारावर गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस निरीक्षक अनिल जीट्टावार यांची भेट घेण्यात आली.
पुन्हा एकदा विनंती आहे की, आपण सुजाण नागरिक म्हणून आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन कॉम्रेड विनोद झोडगे व प्रशांत डांगे यांनी केलेले आहे.

