महाराष्ट्र विद्यालय पिंपळगांव (भोसले) येथे प्रजासत्ताक दिनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण सोहळा साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपूरी : दिनांक,२७/०१/२५ ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव (भोसले) येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे यांनी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक समिती, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यालयातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण केले.
बँड पथकाच्या तालावर गावात प्रभात फेरी काढून गावातील प्रमुख ठिकाणी असलेल्या चौकातील झेंडावंदन करून परत आल्यानंतरविद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर सांस्कृतिक व सामूहिक नृत्याच्या कार्यक्रम घेण्यात आला.सांस्कृतिक कार्यक्रम आटोपल्यानंतर शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च - २०२४ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे सर होते तर प्रमुख अतिथी उमाजी कुथे माजी जिल्हा परिषद,सदस्य,कोसे सर माजी मुख्याध्यापक, मधुकर मेश्राम वार्ताहर, अनिल कांबळी वार्ताहर,प्रफुल भगत, सुधीर कुथे, प्रकाश खरवडे,राजेश क-हाडे आणि पालक सदस्य उपस्थितांनी गुणवत्ता प्राप्त प्रथम,द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांना रोख तथा सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरी सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे नियोजन व मार्गदर्शन महाले सर, सचिन क-हाडे सर,घ्यार सर ,सडमाके सर , अंशुल राऊत मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन मेश्राम सर तर आभार नाकाडे सर यांनी उपस्थितांचे मानले.