वंचित बहुजन आघाडीची मुलचेरा अडपल्ली मलेझरी येथे मोर्चेबांधणीत्मक सभा संपन्न.
📍पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्यामध्ये मोठा उत्साह.
एस.के.24 तास
मुलचेरा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी गडचिरोलीची बैठक मूलचेरा तालुक्यातील अडपल्ली मलेझरी मूलचेरा येथे पार पडली.मागील साडेतीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाची आरक्षण सोडत पार पडली.आगामी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठका उमेदवार चाचपनी मोर्चा बांधणी सुरू झाली आहे.
वंचित बहुजन आघाडी सुद्धा संपूर्ण ताकतीने जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या संपूर्ण जागा लढणार आहे. या अनुषंगाने मूलचेरा अडपल्ली मलेझरी येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक बाबत सविस्तर चर्चा करून सर्व जागेवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार असून गावा गावात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देण्यावर भर देण्यात येईल व जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
अशी चर्चा करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे पूर्व विदर्भ संयोजक प्रा.हितेश मडावी,वंचित बहुजन आघाडी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे, वंचित बहुजन आघाडी गडचिरोलीचे जिल्हा महासचिव मंगलदास चापले, वंचित बहुजन आघाडी गडचिरोली चे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथजी दुधे वंचित बहुजन आघाडी तालुका मुलचेरा तालुका महासचिव धर्मपाल गोंगले तसेच येथील पदाधिकारी राहुल दुधे ,दीपक उराडे ,राजेंद्र अलोने, बंडू वनकर, रत्नाकर चांदेकर, बंडू चांदेकर ,बंडू फुलझेले ,माणिक वनकर, सुरज चांदेकर ,सिद्धांत निमसरकार, प्रफुल दुर्गे ,रवी दुर्गे प्रतिमा, डोरलीकर, जितेंद्र डोरलीकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.