पट्टेदार वाघ अचानक समोर आल्याने गाडीवरून खाली पडलेल्या तिघांसाठी संतोषसिंह रावत बनले देवदूत.

पट्टेदार वाघ अचानक समोर आल्याने गाडीवरून खाली पडलेल्या तिघांसाठी संतोषसिंह रावत बनले देवदूत.


राजेंद्र वाढई - उपसंपादक एस.के.24 तास


मुल : दिनांक,२७ सप्टेंबर २०२५ मुल चंद्रपूर हायवे मार्गावर केसलाघाट येथे श्री.हनुमानाचे मंदिर आहे. हे स्थळ वनविभागाच्या बफर झोन मध्ये येत असून आज दिनांक,२७/९/२०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास केसलाघाट टर्निंगवर दोन वाघ रस्त्याच्या उजव्या बाजूला बसून होते.तेवढ्याच मुल कडून चंद्रपूर मार्गाने एक टू व्हीलर मोटार सायकलने विकास जानकीराम कुळमेथे वय वय,32 वर्ष पत्नी अंजनी विकास कुलमेथे व लहान मुलगा असे परिवारासह जात होते.


त्याच टर्निंग पॉइंटवर बसून असलेले दोन्ही वाघ तोच रस्ता क्रॉस करायला निघाले असता मोटार सायकलस्वारला वाघ दिसल्याबरोबर दुचाकी स्वार घाबरला आणि मागे बसून असलेली त्याची पत्नी व मुलगा रस्त्यावरच खाली पडले.व वाघ रोड क्रॉस करून डावीकडे गेला.चंद्रपूरकडे जाणारे प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी जी.प.व बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत आपल्या कामाच्या निमित्याने चंद्रपुरला जात असतानाच दुचाकीस्वार व सोबतची बाई मुलाला घेऊन खाली पडल्याचे दिसले. 


हा प्रकार त्यांच्या डोळ्यासमोर सदरची घटना घडली. व समोर वाघही रस्ता क्रॉस करताना दिसला. तेव्हा स्वतः आपली गाडी थांबवून दुचाकी स्वारला व त्याच्या पत्नी व मुलाला उचलूंन आपल्याच गाडीत टाकून चंद्रपूरला उपचार करण्यासाठी नेले. हा माणुसकीचा धर्म संतोष रावत यांनी पाळला. जर का संतोष रावत त्याच वेळेला तिथे गेले नसते तर मात्र मोठी घटना घडली असती. 


सुद्धा दुचाकी चालक विकास कुळमेथे व त्याची पत्नी अंजनी ,मुलगा यांना किरकोळ जखमा झाल्याने तिघांनाही तात्काळ आपल्याच गाडीने नेऊन रुग्णालयात भरती केले.व देवदूत म्हणून माणुसकीचा धर्म पाळला. असे असले तरी देवदूत मागे आल्याने तिघांचे प्राण वाचले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !