गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या तुकडे करुन नदीत फेकले ; प्रेमविवाहचा भीषण अंत.
एस.के.24 तास
हैद्राबाद : हैदराबाद च्या मेडिपल्ली भागात हृदयद्रावक घटना घडली आहे.27 वर्षीय सौ.समाला महेंद्र रेड्डी याने संशयाच्या भरात आपल्या 21 वर्षीय गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून केला आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून मुसी नदीत फेकले.
प्रेमाने सुरू झालेले नाते संशय जळफळाट आणि वादामुळे भीषण खून प्रकरणात बदलले.या घटनेमुळे हैदराबाद हादरले असून परिसरात संतापाची लाट आहे.
प्रेम विवाह ते भीषण अंत महेंद्र आणि बी.स्वाती यांनी 20 जानेवारी 2024 रोजी कुकटपल्ली येथील आर्य समाजात प्रेम विवाह केला होता.सुरुवाती चे दिवस आनंदात गेले.पण लवकरच घरगुती वाद आणि संशयामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली. एप्रिल 2024 मध्ये स्वातीने विकाराबाद पोलिसांकडे पती विरोधात हुंडाबळी ची तक्रारही केली होती. गावातील पंचायतीमध्ये ते प्रकरण सोडवण्यात आलं. मात्र महेंद्रच्या मनातील संशय वाढतच गेला.
हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न : -
स्वाती पाच महिन्यांची गर्भवती असतानाही दांपत्यात भांडणे सुरूच होती.22 ऑगस्ट 2025 रोजी स्वातीने माहेरी जाणार असल्याचे महेंद्रला सांगितले. ते ऐकून महेंद्र संतापला.त्याने 23 ऑगस्ट रोजी पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाचे कुऱ्हाडीने तुकडे करून डोके, हात,पाय नदीत फेकले,तर धड आपल्या खोलीत लपवून ठेवले.
पोलिसांची तात्काळ कारवाई : -
रचकोंडा पोलिस आयुक्त जी. सुधीर बाबू आणि डीसीपी पद्मजा यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिपल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी महेंद्रला अटक केली.या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.