कुर्झा वार्डात दिवाळीनिमित्त " सौदा जन्मदात्याचा " नाटकाचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१८/१०/२५ येथील कुर्झा वार्डातील इंदिरा गांधी चौकातील पाण्याच्या टाकीजवळ दिनांक २१ ऑक्टोंबर २०२५ रोज मंगळवारला रात्रो १०.००वा. ॐकार नाटय मंडळाचे श्रीकांत तुमसरे लिखित संगीत ' सौदा जन्मदात्याचा ' या तीन अंकी नाटयप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर नाटकात कवी,लेखक डॉ धनराज खानोरकर, पटवारी उराडे,अरविंद लाखे, शेखर बावनकुळे, आकाश उराडे,भास्कर खानोरकर,परीश खेत्रे,पुष्पक पंचभाई यांची महत्त्वाची भूमिका असून मिस मैना,मिस मेघना,मिस ऋतुजा या स्त्री कलावंत आहेत.निर्माता खुशाल विखार असून प्रयोग सहाय्यक म्हणून राजू चिलबुले काम पाहणार आहेत.
तरी या नाट्य प्रयोगाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मंडळानी केले आहे.