मुल तालुक्यातील जुनासूर्ला गावालगत भीषण अपघातात 2 युवक जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी.
एस.के.24 तास
मुल : शेतात कापूस धान पिकांवर औषधी फवारणीचे दिवस आहेत.करिता 2 युवक शेतकरी औषध खरेदी करून पोंभुर्णा येथून पेंढरी मक्ता कडे दुचाकी ने येत असतांना जुनासूर्ला गावाच्या हद्दीत ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने 2 युवकांचा मृत्यू झाला तर 1 युवक गंभीर जखमी झाल्याने चंद्रपूर ला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवक कापसाला फवारणीचे औषध खरेदी करून दुचाकीने गोंडपिपरी खेडी मार्गे येत असतांना पोलीस स्टेशन मुल अंतर्गत जुनासूर्ला गावाच्या हद्दीत ट्रकने दुचाकी उडविले.
ही घटना दुपारी 2:30.वा.च्या सुमारास घडली असून या अपघातात सारंग गंडाटे वय,26 वर्ष रा.पेंढरी मक्ता याचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांशु गंडाटे वय,23 वर्ष रा.पेंढरी मक्ता याचा मुल उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.लंकेश समर्थ वय,28 वर्ष रा.मुंडाळा हा जखमी असून चंद्रपूर ला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत