शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना पोलिसांनी गडचिरोलीतून अटक.
📍बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापकास मंजुरी भोवली.
एस.के.24 तास
नागपुर : बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित केल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली.
त्यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मंजुरी दिल्याचा आरोप आहे. त्यांना मध्यरात्री 12:30 नंतर नागपुरात आणण्यात आले.या प्रकरणात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके, रा.जेवताळा, ता.लाखनी, जि.भंडारा यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.