" भारतीय खगोलशास्त्र " विषयावरील पुस्तकाचे नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून प्रकाशन.
अमरदीप लोखंडे - सह संपादक
ब्रम्हपुरी : संस्थेचे माननीय सचिव मा.अशोकजी भैया यांनी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील प्राध्यापक डॉ. विवेक नागभिडकर आणि डॉ.अतुल येरपुडे यांचे अभिनंदन करताना सांगितले की, " भारतीय ज्ञान परंपरेला शास्त्रीय रूप देणारे हे पुस्तक ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. प्राध्यापकांचे हे कार्य निश्चितच विद्यार्थी व इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे."
" भारतीय खगोलशास्त्र " या नावाचे हे पुस्तक बी.एस्सी. द्वितीय सत्र (Semester II) साठी असून,एस.चंद अॅण्ड कंपनी प्रकाशन,नवी दिल्ली यांनी प्रकाशित केले आहे. हे पुस्तक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार तयार करण्यात आले आहे. पुस्तकामध्ये आर्यभट, वराहमिहिर, भास्कराचार्य यांसारख्या प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांचे योगदान मांडण्यात आले आहे.
या शैक्षणिक यशाबद्दल प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे सर यांनी अभिनंदन करताना सांगितले की, "हे कार्य महाविद्यालयाच्या बौद्धिक स्तराचे प्रतीक आहे. अशा कृती शिक्षण संस्थेला नवीन उंचीवर घेऊन जातात."
उपप्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर सर यांनी देखील दोन्ही लेखकांचे अभिनंदन करताना नमूद केले की, "ही शैक्षणिक कामगिरी महाविद्यालयाच्या संशोधनात्मक प्रयत्नांना गती देणारी आहे." हे पुस्तक नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत एक नवा मैलाचा दगड ठरत आहे.