बोरमाळा घाटावर बैल धुण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय कार्तिक सोमनकर मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू.

बोरमाळा घाटावर बैल धुण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय कार्तिक सोमनकर मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू.


एस.के.24 तास


गडचिरोली : बैल धुण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 6 जून रोजी सकाळी 10:30 वा.च्या सुमारास घडली.कार्तिक ज्ञानेश्वर सोमनकर वय,15 वर्ष रा.हनुमान वॉर्ड,गडचिरोली असे मृताचे नाव आहे.


कार्तिक शिवाजी विद्यालयात शिकत होता.तो गुरूवारी इतर मुलांसोबत बोरमाळा घाटावर बैल धुण्यासाठी गेला होता.तो बैलाची शेपटी धरून पाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे जात होता.बैलाची शेपटी सोडली व तो पाण्यात बुडू लागला. इतरांनाही पोहता येत नसल्याने त्याला कोणीच वाचवू शकले नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !