धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने,जिल्हास्तरीय महिला उद्योग प्रदर्शनी.
एस.के.24 तास
चंद्रपूर- धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने नऊ गावातील स्वयंसहायता समूहाद्वारे सुरू असलेले विविध व्यवसाय यांची एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर द्वारे आयोजीत कार्यक्रम प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान येथे जिल्हास्तरीय उद्योग प्रदर्शनी मध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर श्री. अशोक रामाजी उईके (आदिवासी विकास तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा प्रमुख पाहुणे )होते, तसेच कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष श्री हंसराज अहिर (नवी दिल्ली) यांची होती.
कार्यक्रमाला उपस्थित माननीय खासदार श्री.नामदेव किरसान, माननीय खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, माननीय आमदार श्री अभिजीत वंजारी, माननीय आमदार श्री सुधाकर अडबाले माननीय आमदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार, माननीय आमदार श्री. विजय वडेट्टीवार, माननीय आमदार श्री. कीर्ती कुमार उर्फ बंटी भांगडिया , माननीय आमदार श्री. किशोर जोरगेवार , आमदार श्री. करण देवतळे, श्री विनय गौडा (जिल्हाधिकारी, चंद्रपूर), श्री पुलकित सिंग ( मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर), मुमक्का सुदर्शन ( जिल्हा पोलीस अधीक्षक ) उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये ॲडव्हान्स स्टीचिंग प्रोडक्ट, पत्रावळी प्रोडक्ट, तार घासणी प्रोडक्ट, एलईडी बल्ब आणि मसाले आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला सक्षमीकरण कार्यक्रम द्वारे वरील व्यवसाय करण्यास सुरू आहे. कार्यक्रमाला डॉ.अनिश नायर सर, शितल नागपुरे, अंजुषा काकडे,अलका पानगंटीवार , दिनेश कामतवार, पूजा वानखेडे, आशिष व माधुरी श्रीवास्तव सर्वांचे सहकार्य होते.