राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती तसेच समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात साजरा.
एस.के.24 तास
गडचिरोली : बुधवार दिनांक १४/०१/२०२६ रोजी प्रबुद्ध बौद्ध विहार, बाबासाहेब आंबेडकर चौक, गडचिरोली येथे समता संघर्ष समाज विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रशिक्षण संस्था, गडचिरोली व समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य, शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती तसेच समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचा द्वितीय वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्मती मायाताई मोहुर्ले, महिला प्रदेश अध्यक्षा, समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य या होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन मा. दिगंबर लाटेलवार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते झाले. सहउद्घाटक म्हणून मा. प्रभाकर वासेकर (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक) व मा. दादाजी बोलीवार (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक) उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून लक्ष्मण मोहुर्ले, सामाजिक कार्यकर्ते, गडचिरोली हे उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.विकास गोरडवार सर (गडचिरोली), राजेश कलगट्टिवार (गोंडपिपरी) व विजय देवतळे, प्रदेश उपाध्यक्ष हे लाभले. तसेच मंचावर भास्कर मेश्राम सर (मिहिर फाउंडेशन), धर्मानंद मेश्राम (सत्यशोधक फाउंडेशन), राज बनसोड सर सामजिक कार्यकर्ते, सुनील मोहुर्ले (गडचिरोली जिल्हाध्यक्ष),संजय गोरडवार (जिल्हा संघटक), परमेश्वर मोहुर्ले (चामोर्शी तालुका अध्यक्ष), कालिदास लाटेलवार, प्रमोद रामटेके, जयश्री रामटेके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानिमित्त समाजातील विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.प्राथमिक गटात – समीप बाळकृष्ण गोरडवार (प्रथम), स्तर्श किशोर नरुले (द्वितीय) व परी राजेंद्र बोलीवार (तृतीय).माध्यमिक गटात – स्नेहल किशोर नरुले (प्रथम), संस्कार मनोहर रामटेके (द्वितीय) व हर्षल लाटेलवार (तृतीय).उच्च माध्यमिक गटात – संकेत किशोर पुल्लीवार याने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत पृथ्वी राजेंद्र बोलीवार, मिष्टी लोकेश येनगंटीवार, अभिनय गोरडवार, प्रिन्सी येनगंटीवार, प्रलय मोहुर्ले, खुशी लाटेलवार, श्वेता रामटेके, खुशी येनगंटीवार, हर्षल लाटेलवार, प्रेम प्रदीप लाटेलवार, कुणाल बोलीवार, अमन विजय कलमुलवार आदी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला बाळकृष्ण गोरडवार,राजेंद्र बोलीवार, लोकेश येनगंटीवार, परशुराम बोलीवार, आशिष पुल्लीवार,नवनीत गोरडवार,प्रदीप लाटेलवार, प्रकाश मोहुर्ले यांच्यासह पालक, समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप येनगंटीवार, प्रदेश सहसचिव यांनी केले, तर संघटनेचे वतीने आभार प्रदर्शन किशोर नरुले, प्रदेश सचिव यांनी व्यक्त केले.

