भारतीय संविधान दिनाच्या निमित्याने चिरोली मध्ये ग्रामसफाई अभियान राबवून गाव स्वच्छता करण्यात आली.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : 26 नोव्हेंबर 75 व्या संविधान सन्मान दिनाच्या औपचारिक साधून आज चिरोली मध्ये युवक आणि प्रतिष्ठित नागरिक व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी गावात ग्रामसफाई अभियान राबवून गाव स्वच्छ करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रक्ताची शाई करून शरीराची परवा न करता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीमध्ये 395 कलमे आणि आज परिशिष्टे लिहून जगातील सर्वात महान बलशाली राज्यघटना लिहिली.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रश्नात विभागाने 24 नोव्हेंबर 2018 ला आदेश काढून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले व भारत सरकारने बाबासाहेब आंबेडकरांची 125 वी जयंती वर्ष साजरे केले जात असतात 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.
संविधान बाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचा उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत जी रामटेके पोलीस पाटील अक्षय आसमवार आदित्य कामेडवार अंकुश सूत्र पवार गणेश रापकवार सुरज बनकर धम्मा दहिवले बालू दहिवले महेंद्र बनकर आशिष गद्देकार खोबरे राजू खोबरे,राजू खोबरे निकुरे प्रणय तक्षु बनकर अंकुश दहिवले निखिल बनकर व समस्त गावकरी उपस्थित होते.


