भालेश्वर येथे सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचेआयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : मकर संक्रांतीचे औचित्य साधून शिवलिंग काली पुत्र नवनाथ मंदिर देवस्थान भालेश्वर यांच्या पुढाकाराने दिनांक १४ जानेवारी २६ ला सप्त खंजेरी निर्माते राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज आकोट यांच्या जाहीर समाज प्रबोधन कीर्तन, महाप्रसाद, सत्कार समारंभाचा कार्यक्रम कार्यक्रम वैनगंगा नदी किनारी आयोजित करण्यात आलेला आहे.
या निमित्याने भगवान शंकर,शिवलिंग, कालीपुत्र तथा नवनाथ भगवंताचे पूजन व भव्य यात्रेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक खेमराज तिडके, कृष्णाभाऊ सहारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सतीश भाऊ वारजुकर,अध्यक्ष प्रमोद चिमुरकर , उपाध्यक्ष,पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, मेजर अरुण पिसे हे उपस्थित राहणार आहेत.
सप्तखंजेरी निर्माते सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधन कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवलिंग कालिपुत्र नवनाथ मंदिर देवस्थान भालेश्वरच्या आयोजक मंडळाने केले आहे.

