ने.हि.महाविद्यालयाची चिन्मयी मडावीला इंद्रधनुष्य २०२५ चे सुवर्णपदक
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील चिन्मयी चंद्रशेखर मडावी या विद्यार्थींनीला गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील अश्वमेघ व इंद्रधनुष्य २०२५ च्या उपक्रमात शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये सहभागी विद्यार्थ्यांमधून सर्वात जास्त प्राप्त गुण सी जी पी ए ८.२५ मिळाल्यामुळे कु.चिन्मयी सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.
नुकताच प्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकर, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.पद्माकर वानखडे उपस्थित होते.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताताई भैया, उपाध्यक्ष अँड प्रकाश भैया,सचिव अशोक भैया, सहसचिव अँड भास्कर उराडे, सदस्य गौरव भैया, समस्त प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करुन तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

