चनई ( बु )येथे दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोज शुक्रवार ला भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन.
सुरेश कन्नमवार !मुख्य संपादक!एस.के.24 तास
कोरपना : भारतीय जनता पार्टी, आदिवासी आघाडी राजुरा विधानसभा, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर,ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन शाखा-कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन कोरपना तालुक्यातील चनई (बू) येथे करण्यात आले आहे.
यामध्ये गोंडी गाण्यांचा आर्केस्ट्रा व पारंपरिक गोंडी ढेमसा,नवनिर्वाचित सरपंच /उपसरपंच यांचा सत्कार,आदिवासी समाजाच्या विविध समस्या यावर महसूल विभागाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम, आदी मिळणाऱ्या योजनेविषयची माहिती देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक:मा.ना.श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार,मंत्री वने, सांस्कृतीक कार्य, मत्स व्यवसाय व पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा हे राहणार आहे.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा.श्री.हंसराजभैय्या अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार हे राहणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. देवरावदादा भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष,मा.ऍड. संजयभाऊ धोटे माजी आमदार,मा.सुदर्शनजी निमकर माजी आमदार,मा.खुशालजी बोन्डे चंद्रपूर लोकसभा विस्तारक,मा.नामदेवरावजी डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा,मा.आशिष देवतळे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष,मा.कु.अल्काताई आत्राम महिला जिल्हाध्यक्षा,मा.ऍड.हरीश गेडाम जिल्हाध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी चंद्रपूर,मा.सौ.विजयालक्ष्मी डोहे जिल्हा महिला आघाडी महामंत्री चंद्रपूर,मा.नारायणजी हिवरकर तालूका अध्यक्ष तथा जिल्हा उपध्यक्षा भाजपा, मा. सतिशभाऊ उपलेंचीवर विस्तारक राजुरा विधानसभा आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
तरी या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिवासी नेते श्री.अरुण पाटील मडावी राजुरा विधानसभा प्रमुख भाजपा आदिवासी आघाडी यांनी केले आहे.

