धानोरा तालुक्यातील खुटगाव येथे खर्रा खाण्यासाठी पतीने पैसे न दिल्याने महिला घरातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना.
एस.के.24 तास
धानोरा : खर्रा खाण्यासाठी लागणारे पैसे पतीने देण्यास नकार दिल्याने संतापलेली एक 41 वर्षीय महिला घरातून बेपत्ता झाल्याची विचित्र आणि धक्कादायक घटना धानोरा तालुक्यातील खुटगाव येथे घडली आहे.या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून चातगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
भाविका प्रमोद मेश्राम वय,41 वर्ष असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. पती प्रमोद मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भाविकाने त्यांच्याकडे खर्रा खाण्यासाठी पैसे मागितले होते.पतीने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.या वादानंतर पती प्रमोद मेश्राम नेहमीप्रमाणे शेतावर कामासाठी निघून गेले.
प्रमोद मेश्राम सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घरी परतले असता मुलगा दुष्यंत याने सांगितले की, आई दुपारी 12:00.वा.च्या सुमारास चातगाव ला बाजार करायला जाते असे सांगून घरातून निघून गेली आहे.बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली.
तपासा दरम्यान,गावातील एका ऑटोचालकाने भाविका मेश्राम हिला खुटगाव - चातगाव मार्गावर पायी जाताना पाहिल्याचे समोर आले आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन : बांधा मजबूत,उंची अंदाजे 5 फूट, रंग सावळा, केस काळे, चेहरा गोल. अंगात हिरव्या रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केलेला आहे. ही महिला कुणाला आढळून आल्यास 9403249671,9403440915 किंवा 7709734753 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चातगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी करत आहेत.

