देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कोरेगाव चोप येथील अपघातात महिला जागीच ठार
एस.के.24 तास
देसाईगंज (वडसा) : अर्जुनी वडसा मार्गावरील इटखेडा/ ईसापुर गावाच्या सुरुवातीच्या असलेल्या वळणावर रेवती किशोर मस्के राहणार कोरेगाव तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली यांचा दुर्दैव मृत्यू झाला.घटना 30 जानेवारी रोजी सायंकाळी 7:00.वा.च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी एक नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रालीसह उभा होता.त्या ट्रॅक्टरला रेवती हिने धडक दिली.व त्यातच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच अर्जुनी मोर.पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले.
मृतक महिला रेवती किशोर मस्के हिचे मुळगाव कोरेगाव येथील असून त्यांचे पती आपल्या स्वगावी कोरेगाव येथे मेडिकल चालवतात त्यांची दोन्ही मुले अर्जुनी मोर येथील सरस्वती विद्यालयात शिक्षण घेत असल्यामुळे रेवती ही मुलांसोबत अर्जुनी मोर.येथे राहत होती.
पती बाहेरगावी गेल्यामुळे आज दिवसभर कोरेगाव येथील मेडिकल रेवती हिने चालविले व सायंकाळी अर्जुनी मोर.येथे मुलांकडे राहायला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली सदर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे नेण्यात आले आहे.

