ताडोबा जंगलालगतच्या चोरगाव येथील शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू.

ताडोबा जंगलालगतच्या चोरगाव येथील शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू.


एस.के.24 तास


चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील ताडोबा जंगल लगतच्या चोरगाव मधील उद्धव वारलूजी मोहुर्ले वय,६५ वर्ष यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.शुक्रवारी (३० जानेवारी) दुपारी ४ वाजता दरम्यान वरवट चोरगाव मार्गावरील शेतीच्या कामासाठी स्वतःच्या शेतात गेले असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला व जंगलात फरफटत नेले.


रात्रभर शोध घेतल्यानंतर तपास लागला नाही.शनिवारी (३१ जानेवारी) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर ५८५ कंपार्टमेंट मध्ये मृतदेह आढळला. मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !