आणीबाणी संघर्ष नायक स्व.मा.बाबुराव लांबे (गुरुजी) यांचा कुटुंब प्रमुख म्हणून प्रा. संजय लांबेचा सत्कार.
अमरदीप लोखंडे,सहसंपादक
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी येथील सेवे निमित्त रहिवासी व भद्रावती येथील मुळ निवासी प्रा. संजय लांबे यांचा लोकसेवा मंडळ संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे विद्यालयाच्या अमृत महोत्सवी प्रसंगी त्या शाळेचे प्रथम मुख्याध्यापक व मंडळाचे सचिव आणि आजीव सदस्य स्व.मा.बाबुराव लांबे हे आणिबाणीच्या काळात मीसाबंदी म्हणून त्यांना १९ महिने नाशिक येथे बंदीवान होते.
त्यांचे स्मरण म्हणून या अमृतमहोत्सवी प्रसंगी त्यांच्या नंतर कुटुंब प्रमुख म्हणून प्रा. संजय लांबे यांचा लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष मा. चंद्रकांत गुंडावार, गोपाळ ठेंगणे सदस्य, नामदेवरा कोल्हे मंडळाचे माजी सचिव यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व मेमोंटो देवुन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे सहसचिव अमित गुंडावार,सचिव उल्हास भास्करराव, सदस्य उमाकांत गुंडावार,महाविद्यालयाचे प्राचार्य मा. रूपचंद धारणे,दै.अधिकारनामाचे शहर प्रतिनिधी नंदकिशोर गुड्डेवार, शरद लांबे, माजी नगरसेवक अतुल पाटील गौरशेटीवार, अमृत महोत्सवाचे समन्वयक प्रा, सचिन सरपटवार, शिक्षक प्रतिक नारळे उपस्थित होते.

