अवैध ट्रॅक्टरच्या धडकेत दोन विद्यार्थी जखमी,एकाची प्रकृति चिंताजनक.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : तालुक्यातील अ-हेरनवरगाव वरुन दोन शाळकरी विद्यार्थी गणराज्य दिनानिमित्त नेवजाबाई हितकारिणी विद्यालयात स्कुटीने जात असता कुर्झा बोंडेगांव रस्त्यावरती राधाकृष्णनगरी जवळ विरुध्द दिशेने येणार्या ट्रॅक्टर चालकाने स्कुटीला धडक दिल्यामुळे ते स्कूटी वरुण खाली पडून विध्यार्थी जखमी झाले.
सदर घटना आज सकाळी 6:00.च्या दरम्यान घडली.यात यश प्रकाश मेश्राम वय,14 वर्ष रा.अ-हेरनवरगाव याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे व रोनक राजु नागपुरे वय,14 वर्ष राहणार मांगलगाव किरकोळ जखमी असून प्रथम ऊपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचाराकरीता नेण्यात आले.त्यानंतर जखमी ची अवस्था गंभीर असल्यामुळे पुढील उपचाराकरीता आस्था हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे भरती करण्यात आले.
ट्रॅक्टर चालक दुर्योधन गजानन तलमले वय,32 वर्ष राहणार भालेश्वर ट्रॅक्टर क्रमांक. MH.34 CD 7668 याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन जखमी च्या एक्टिवा मोपेड क्रमांक. MH.34 CP 6139 ला धडक दिली व घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व हवालदार तेजराम जनबंधु घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा करून चौकशी अंती ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंदविला आहे.दोन्ही विद्यार्थी हे नेवजाबाई हितकारिणी विद्यालयातील विद्यार्थी असुन एनसीसी मध्ये असल्यामुळे परेड करिता ऊपस्थित राहणार होते.

