रणमोचन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शहीद बालक स्मृतिदिन साजरा ; शहीद चारही बालकांना गावकऱ्यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली.

रणमोचन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शहीद बालक स्मृतिदिन साजरा ; शहीद चारही बालकांना गावकऱ्यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली.


अमरदीप लोखंडे  - सहसंपादक


ब्रम्हपुरी : २२ जानेवारी १९९९ रोजी गांगलवाडी बिटा-अंतर्गत तालुक्यातील बरडकिन्ही येथून क्रीडा संमेलनात विजयश्री प्राप्त करून रणमोचन गावाकडे ट्रॅक्टरने परत येत असतांना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या मिनीट्रकने धडक दिल्यामुळे रुई (विद्यानगर जवळ) मोठा अपघात घडला होता. त्या अपघातामध्ये रनमोचन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थी मृत्युमुखी पडले तर अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते. 


त्या शहीद विद्यार्थ्यांमध्ये प्यारेनंद पंढरी शंभरकर, प्रदीप वामन ठाकरे, शांताराम नवलाजी राऊत, प्रकाश शंकर ठाकरे, यांचा समावेश होता. त्या चारही बालकांचा २६ वा शहीद बालक स्मृतिदिन कार्यक्रम गुरुवार दिनांक २२ जानेवारी२०२६ रोजी रणमोचन येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत संपन्न झाला.आज ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गांगलवाडी बिटात जवळपास २४ शाळेत हा काळा दिवस म्हणून पाळला जातो.सर्वप्रथम शहीद स्तंभाचे पूजन व शहीद बालकांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. 


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रणमोचन ग्रामपंचायतींच्या सरपंचा नीलिमा राऊत  तर उपाध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेशम शंभरकर, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सदाशिव ठाकरे, पत्रकार  विनोद दोनाडकर, नवलाजी राऊत. वामन ठाकरे, वनिता ठाकरे, शर्मिला शंभरकर, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी दोनाडकर, मंदाबाई साहारे,शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यां लक्ष्मीबाई दोनाडकर


जोशना बुराडे, अस्मिता पिलारे पोलीस पाटील,पार्वता ठाकरे, नीलकंठ राऊत, केशव राऊत, रमेश रासेकर, धनलाल शेंभरकर, अंगणवाडी सेविका सोनी शेंन्डे, दादाजी पिलारे अध्यक्ष तंटामुक्त समिती. आनंदराव मेश्राम, शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र आंबोरकर , शिक्षिका प्रीती बालपांडे , स्मिता पिल्लेवान  महिला पुरुष ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. याप्रसंगी त्या शहीद चारही विद्यार्थ्यांना दोन मिनिटं मौन पाडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 


कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन काशिनाथ हेडाऊ , तर पाहुण्यांचे आभार शैला राऊत यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पना संगत , आणि पिंकु कावळे यांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !