गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावातील खळबळ जणक प्रकार,दारूच्या व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त... 📍दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला पेट्रोल ओतून पत्नीला जिवंत जाळल,एका महिन्यानंतर मृत्यू प्रेमविवाह ते निर्दयी हत्या दोन मुलं अनाथ.


गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावातील खळबळ जणक प्रकार,दारूच्या व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त...


📍दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला पेट्रोल ओतून पत्नीला जिवंत जाळल,एका महिन्यानंतर मृत्यू प्रेमविवाह ते निर्दयी हत्या दोन मुलं अनाथ.


एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावात पतीने आपल्या पत्नीला जिवंत जाळून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.पत्नीने दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागात पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याचं वृत्त आहे.पीडित महिलेवर जवळपास एक महिन्यापासून उपचार सुरू होते,पण शेवटी नागपूर रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.पीडितेचा आरोपी पतीसोबत प्रेमविवाह झाला होता.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव प्रियंका सुशील बारसागडे असून 2018 मध्ये तिने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन सुशील सोबत प्रेमविवाह केला होता.सुशील मजूरी करून आपलं घर चालवत होता. लग्नानंतर काही वर्षे दोघांचा सुखाचा संसार सुरू होता.पण, दारूच्या व्यसनामुळे त्यांचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला. सुशील दारूसाठी सतत प्रियंकाकडे पैसे मागायचा आणि दारूच्या नशेत तिला मारहाण देखील करायचा.


16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी जवळपास 5 :00. वा.च्या सुमारास सुशीलने दारूसाठी आपल्या पत्नीकडे पैशांची मागणी केली.प्रियंकाने पैसे देण्यासाठी नकार दिला.त्यानंतर आरोपी पतीने तिला बेदम मारहाण केली आणि कपाटातून 2000 रुपये घेऊन तो घरातून निघून गेला.काही वेळानंतर,तो पुन्हा घरी परत आला.त्यावेळी प्रियंका स्वयंपाकघरात काम करत असताना त्याने मागून तिच्यावर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. 


प्रियांकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिची 5 वर्षांची मुलगी सुप्रिया सुद्धा जोरजोरात रडू लागली आणि शेजारचे लोक घटनास्थळी धावले. तोपर्यंत प्रियांकाचं शरीर ते 40 ते 50 टक्के भाजलं होतं.आरोपी पतीने पकडलं जाऊ नये म्हणून चादरीने आग विझवण्याचं नाटक केलं.


या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या प्रियंकाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आण त्यानंतर तिला नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केलं.20 जानेवारी रोजी तिची प्रकृती खालावल्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे,गडचिरोली पोलिसांनी आरोपी सुशील चिंटूजी बारसागडे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.धक्कादायक घटनेमुळे दोन निष्पाप मुलांवरून आईचं छत्र हरपलं.परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !