काँग्रेस मध्ये नाना भाऊ - विजय भाऊ; एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती,असे कोण म्हणाले...
एस.के.24 तास
नागपूर : “ काँग्रेसमध्ये विजय भाऊ व नानाभाऊ या दोघांना आता केवळ खुर्चीची स्वप्नं पडत आहेत. आपण दोघं भाऊ भाऊ आणि एकमेकांना फाडून खाऊ अशी या दोघांची स्थिती आहे.विदर्भाच्या राजकारणात या दोघांमधील संघर्षाची चर्चा चालू आहे ”, असं वक्तव्य भाजपा नेते आशिष देशमुख यांनी केलं आहे. देशमुख म्हणाले, “ विदर्भासह महाराष्ट्र काँग्रेसमध्ये केवळ नाना पटोले व विजय वडेट्टीवार या दोघांमधील वादांची चर्चा होत आहे. दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही.तिकीट वाटपावरूनही दोघांमध्ये संघर्ष झाला आहे.
त्याउलट भाजपाप्रणित महायुतीने राज्यातील जनतेला उत्तम सरकार दिलं आहे.” आशिष देशमुख हे पटोले आणि वडेट्टीवारांचे जुने सहकारी आहेत.पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.त्यानंतर देशमुख भाजपात दाखल झाले.आता देशमुख यांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांवर टीका केली आहे.