गडचिरोली पोलीस दलातील ३१ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर.
📍सन २०१८ मधील बोरीया - कसनासूर चकमकीतील शौर्यपूर्ण कामगिरीची दखल ; प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ३९४ पोलीस अंमलदारांना पदोन्नती,१४ शहीद अंमलदारांनाही पदोन्नती.
एस.के.24 तास
गडचिरोली : देशभरात पोलीस दल व इतर सशस्त्र दलांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित करण्यात येते.यावर्षी २५ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मा.महामहीम राष्ट्रपती यांच्याकडून देशभरात एकूण १२१ पोलीस शौर्य पदके जाहीर करण्यात आली असून त्यापैकी गडचिरोली पोलीस दलातील 31 पोलीस अधिकारी व अंमलदारांना हे सन्मान जाहीर झाले आहेत.
यापूर्वी सन २०२५ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील ०७ अधिकारी व अंमलदारांना पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत गडचिरोली पोलीस दलास ०३ शौर्य चक्र व २१७ पोलीस शौर्य पदके प्राप्त झालेली आहेत.२२ एप्रिल २०१८ रोजी मौजा बोरीया–कसनासूर येथे पोलीस दल व माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एकूण ४० माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले होते. या चकमकीत बजावलेल्या शौर्यपूर्ण व यशस्वी कामगिरीची दखल घेऊन खालील पोलीस अधिकारी व अंमलदारांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार : -
१. पोनि. अमोल फडतरे
२. पोउपनि. मधुकर पोचय्या नैताम
३. पोउपनि. वासुदेव राजम मडावी
४. सफौ/विलास मारोती पोरतेट
५. पोहवा/संतोष वसंत नैताम
६. पोहवा/विश्वनाथ सन्यासी सडमेक
७. पोहवा/ज्ञानेश्वर सदाशिव तोरे
८. पोहवा/दिलीप वासुदेव सडमेक
९. पोहवा/रामसू देऊ नरोटे
१०. पोहवा/आनंदराव बाजीराव उसेंडी
११. पोहवा/राजू पंडित चव्हाण
१२. पोहवा/मोहन लच्छु उसेंडी
१३. पोहवा/संदीप गणपत वसाके
१४. पोना/अरुण कैलास मेश्राम
१५. पोना/सुधाकर बिटोजी वेलादी
१६. पोना/नितेश गंगाराम वेलादी
१७. पोना/विश्वनाथ लक्ष्मण मडावी
१८. पोना/कैलास देवू कोवासे
१९. पोना/हरीदास महारू कुलयेटी
२०. पोना/किशोर चंटी तलांडे
२१. पोना/अतुल भगवान मडावी
२२. पोना/अनिल रघुपती आलाम
२३. पोना/नरेंद्र दशरथ मडावी
२४. पोना/आकाश अशोक ऊईके
२५. पोना/घिस्सू वंजा आत्राम
२६. पोना/राजू मासा पुसाली
२७. पोना/महेश दत्तुजी जाकेवार
२८. पोना/रुपेश रमेश कोडापे
२९. पोना/मुकेश शंकर सडमेक
३०. पोना/योगेंद्रराव उपेंद्रराव सडमेक
३१. पोअं/कारे ईरपा आत्राम
पदोन्नतीबाबत माहिती : -
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील एकूण ३९४ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली असून, त्यामध्ये १० अंमलदारांना वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच १४ शहीद पोलीस अंमलदारांना देखील पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे.
८२ पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक पदी पदोन्नती
त्यापैकी ०९ पोलीस हवालदारांना वेगवर्धित पदोन्नती
३२० पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती
०१ पोलीस नाईकाला वेगवर्धित पदोन्नती
०७ शहीद पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक पदी
०७ शहीद पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती
यावेळी पोलीस शौर्य पदक व पदोन्नती प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

