७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा.
एस.के.24 तास
गडचिरोली - संजीवनी नर्सिग कॉलेज तसेच युथ वेलफेअर संस्था विकास भवन यांच्या सयुक्त माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी मा मनोहर हेपट सामाजीक कार्येकर्त यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . त्याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ' तसेच महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा गांधी जी च्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले.
या प्रसंगी संजीवनी नर्सिग कॉलेज चे प्राचार्य संजय भसारकर तसेच प्रमुख वक्ते सेवानिवृत प्रमोद राऊत दिवाकर साहारे प्रणाली सहारे त्याचप्रमाणे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या या प्रसंगी प्रास्तविक करण्यात आले.
मा प्राचार्य यानी बाबासाहेबांनी लिहीलेल्यां संविधानाच्या अनुच्छेद बदल विद्यार्थीना माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर हेपट यांनी संविधानातील मूलभूत गरजाची माहिती दिली . त्याचप्रमाणे प्रमोद राऊत यांनी संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुता तसेच शिक्षणा व आरोग्या विषयी विद्यार्थीनी ला मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला व देशभक्ती पर गीत सादर करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बांबोळे व आभार प्रणाली सहारे यांनी केले.

