मारिया महाविद्यालय मुल येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यावर मार्गदर्शन.
राजेंद्र वाढई : उपसंपादक
मुल : दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोज बुधवार ला मारिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मुल येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावलीचे प्राध्यापक रसायनशास्त्र विभाग प्रमुख, न्याक समन्वयक, तसेच तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. देशमुख सर आणि अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.भास्कर सुकारे लाभले होते.
सन्माननीय प्राध्यापक देशमुख सर यांनी समस्त प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दलची माहिती दिली तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या अधिनियमानुसार विषयाची बास्केट तयार करून प्रत्येक फॅकल्टीच टाईम टेबल कशाप्रकारे आयोजन करायचे आणि नवीन सिल्याबस बद्दल विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रफुल निरुडवार आणि आभार प्रदर्शन प्रा. गजानन मेश्राम यांनी केले.