No title

गांगलवाडी पासून 2 कि.मी.अंतरावर मुई गावालगत असलेल्या गोसेखुर्द नहरात ट्रॅक्टर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटल्यामुळे 1 ठार तर 1 जखमी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,१२/०२/२६ गांगलवाडी पासून 2 कि.मी. अंतरावर मुई गावालगत असलेल्या गोसेखुर्द नहरात ट्रॅक्टर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटल्यामुळे शेतीमालक विश्वनाथ भिवनकर तळोदी खुर्द वय 55 वर्ष हे इंजिन मध्ये दबुन ठार झाले.तर चालक व त्याचा सोबती यांनी उडी मारल्यामुळे ते वाचले परंतु त्यापैकी गिरीधर कन्नाके अंदाजे वय,55 वर्ष जखमी झाला असून त्याचे वर गांगलवाडी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे .


सदर ट्रॅक्टर हा मृतकाच्या शेतावरील तुरी ट्राली मध्ये भरून तळोदी खुर्द येथे जात असता हा अपघात घडला. सदर घटना ही आज सकाळी 11:00.वा.दरम्यान घडली.दिपक अलाम हा जनतेची शेतीपासून ते ईतर कोणतीही कामे पैसे न घेता फक्त दारुच्या टिल्लुसाठी करीत असतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.आज सुद्धा तो गोवर्धन मेश्राम यांचा ट्रॅक्टर घेऊन विश्वनाथ भिवनकर यांच्या शेतातील कापलेल्या तुरी ट्रालीमध्ये भरून मुई शेतशीवारातु तळोदी खुर्द येथे परत जात असतांना सदर अपघात घडला.


या वेळी तो मद्य सेवन केलेला होता असे अपघात पाहणा-या नागरीकांचे म्हणने होते.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !