गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे. यात आंबेडकरी चार संघटनेचे पुर्नजिवन करणे गरजेचे असून येत्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेस व भाजपाला बाजुला सारून तिसरी शक्ती निर्माण करा व यांनाच निवडुन द्या अश्या प्रकारचे मार्गदर्शन पुज्य भन्ते ज्ञानज्योती रामदिगी संगाराम गिरी यांनी बुद्ध विहार नवेगांव येथील वर्षावासाच्या संघदान कार्यक्रमात केले.
तभागत बुद्ध.फुले शाहु डॉ.बाबासाहेब आंबेडकर सम्यक विहार न्यास नवेगांव गडचिरोली येथे वर्षावासाच्या संघदान कार्यक्रम भन्ते ज्ञानज्योती व त्यांचे सहकारी भिक्खू संघ प्रामुख्याने उपस्थित होते. भन्ते ज्ञानज्योती पुढे म्हणाले की सर्व शासकीय जमीनीचे आणि उदयोगाचे राष्ट्रीय करण करणे गरजचे अन समता मुल्यक समाज निर्मिती करणे हेच रिपाईचे मुख्य ध्येय आहे.
आणि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या चारही मातृसत्ताक संघटनाचे पुर्नजिवन करणे गरजेचे आहे.
बुद्ध धम्म म्हणजेच क्रांती आणि क्रांती म्हणजेच परिवर्तन आणि परिवर्तना करीता रिपब्लिकन हा शब्द बौद्ध धम्म कोषातून घेतलेला शब्द आहे असे विचार वर्षावास कार्याक्रमाच्या निमित्याने भन्ते ज्ञानत्यांनी यांनी मांडले. त्यांनतर विवेकानंद नगरात प्रबुद्ध बुद्ध विहार गडचिरोली , पंचशिल बौद्ध समाज व्याहाड खुर्द , किसान नगर येथील सम्येक बौद्ध विहारात सुद्धा कार्यक्रम पार पडला.