ब्रम्हपुरी तालुक्यातील व गणेशपुर (मेंडकी) येथे शोककळा.
★ जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने चार शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,११/०९/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर मेंडकी येथील शेतकरी शेतातील धानाला खत मारण्यासाठी गेले.खत मारता मारता शेतात थ्री फेस लाईन असल्यामुळे कदाचित ओलाव्यामुळे (अर्थिंगला) असलेल्या जिवंत करंट मुळे मृत्यू झाला असे बोलले जात आहे.
1) नानाजी पुंडलिक राऊत वय,50 वर्ष 2) प्रकाश खुशाल राऊत वय,40 वर्ष 3) युवराज झींगर डोंगरे वय, 45 वर्ष तिघेही राहणार गणेशपुर व
4) पुंडलिक मानकर वय,60 वर्ष राहणार चिचखेडा
यांचा शेतात जागीच मृत्यू झाला.यात दोघे जण सुखरूप बचावले.शेतात एकूण सहा जण काम करीत होते.चौघांच्या च्या मृत्यू मुळे ब्रम्हपुरी तालुका व गणेशपुर येथे शोककळा पसरली आहे.
चारही मृतककांचे शव शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी येथे उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.