आरोग्य सेवक पदासाठी तब्बल १५ लाख ; बनावट नियुक्तीपत्र,नकली शिक्के. 📍या प्रकरणी 2 आरोपींना अटक,जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश.

आरोग्य सेवक पदासाठी तब्बल १५ लाख ; बनावट नियुक्तीपत्र,नकली शिक्के.


📍या प्रकरणी 2 आरोपींना अटक,जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश.


एस.के.24 तास


भंडारा : आरोग्य विभागातील आरोग्य सेवक या रिक्त पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावावर तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या रॅकेट अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यात उघडकीस आणताच खळबळ उडाली आहे.


भंडाऱ्यात आरोग्य सेवक पदासाठी प्रति उमेदवार १५ लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भंडारा जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.


जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती करण्याकरिता प्रति उमेदवार १५ लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. धक्कदायक म्हणजे तरुणांना बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रकरणात अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यातून दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भंडारा येथील एक तर, पुणे येथील एकाचा अशा दोघांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आरोग्य सेवक पदाचे बनावट नियुक्तीपत्र आणि त्यासाठी लागणाऱ्या अधिकाऱ्याच्या पदाचे बनावट शिक्केही पोलीस पथकानं ताब्यात घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.


विजय यावलकर असे भंडाऱ्यातून अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून पुण्याच्या व्यक्तीचं नाव कळू शकलेले नाही.या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून त्यांनाही लवकर ताब्यात घेण्यात येईल असं अमरावती पोलिसांनी सांगितले.


प्राप्त माहितीनुसार, भंडारा जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती करण्याकरिता विजय यावलकर आणि त्यांच्यासह असलेल्या रॅकेटमधील अन्य यांनी प्रति उमेदवार १५लाख रुपये घेतले. अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील तरुणांकडून ही रक्कम घेतल्यानंतर त्याला आरोग्य विभागात नियुक्त करण्यात आल्याचे बनावट जॉइनिंग लेटर देण्यात आले. 


त्यानंतर जेव्हा तरुण भंडाऱ्यात नोकरीवर रुजू होण्यास आला तेव्हा त्याची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यामुळं त्यांनी अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यात या रॅकेट विरोधात तक्रार दाखल केली होती. या अनुषंगानं दर्यापूर पोलिसांचं एक पथक या आरोपींच्या मागावर होतं. सापळा रचून या पथकानं विजय यावलकर यांच्याशी संपर्क साधून त्याला शिताफिनं पुण्याच्या अन्य एका आरोपीसह भंडाऱ्यातून अटक केली.


या कारवाईमुळे भंडारा जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागातील आरोग्य सेवक या रिक्त पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावावर तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यात पर्दाफाश केला.या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून त्यांनाही लवकर ताब्यात घेण्यात येईल, असं अमरावती पोलिसांनी सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !