मुल तालुक्यातील चांदापुर फाटा चौकाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू.
एस.के.24 तास
मुल : मुल तालुक्यातील चांदापुर फाटा चौका जवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना 26 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास घडली.कार्तीक निलकंठ सुजागडे वय,25 वर्ष रा.जाम तुकुम ता.पोभुर्णा जि.चंद्रपूर असे मृताचे नाव आहे.
हा भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी आपल्या बहिणीकडे गट्टेगुळा ता. चामोर्शी जि.गडचिरोली येथे गेले होते.ओवाळणी आटोपून व जेवण करून ते आपल्या गावाकडे मोटार सायकल क्रं.MH.34 CF 6366 ने परत येत होते.दुपारचा सुमारास ते चांदापुर फाटा चौका जवळ पोहोचले असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्रं.CG 08 BA 6838६ ने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या मोटार सायकलला जबर धडक दिली.
या धडकेत कार्तीक सुजागडे गंभीर जखमी झाले.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना रस्त्याच्या कडेला नेले आणि चांदापुर येथील सरपंच यांच्या मदतीने खाजगी ऑटोने मुल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात कार चालकाच्या निष्काळजीपणा मुळे एका तरुणाचे आयुष्य अकाली संपले असून मृताच्या नातेवाइक मनोज वामनराव भुरसे यांनी मुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास मुल चे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा तनु रायपुरे करीत आहे.

