जंगलात सिंदी आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात ठार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक, 10/11/2025 ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा मेंडकी येथील रहिवाशी भास्कर गजभिये हा इसम मेंडकी लगत असलेल्या जवराबोडी मेंढा या जंगल शिवारात सिंदी आणण्यासाठी वनपरिक्षेत्र उत्तर ब्रम्हपुरी उपक्षेत्र मेंडकी नियतक्षेत्र मेंडकी येथील जंगला लगत गट क्रमांक ३० खाजगी शेतामध्ये दिनांक,09/11/2025 ला भाष्कर गोविंदा गजभिये रा.मेंडकी वय,55 वर्ष हे धानाचे भारे बांधण्यासाठी सिंदी तोडण्याकरीता गेले असता त्यांचेवर दुपारी,4 :00 च्या सुमारास वाघाने हल्ला करुन ठार केले.
सदरची घटनेची माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर ब्रम्हपुरी नरड साहेब व अधिनिस्त कर्मचारी यांनी मौका स्थळी जाऊन चौकशी केली असता सदरची घटना वाघाचे हल्ल्यात झाल्याचे आढळून आले.मौका स्थळी पंचनामा नोंद करुन शव उत्तरणीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय , ब्रम्हपुरी येथे आणण्यात आले.
मौका स्थळी ०५ कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरा लावण्यात आलेला आहे तसेच मानव व वन्यजीव संघर्ष ऊद्भवू नये याकरीता क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या डयूटया लावण्यात आलेल्या आहेत.

