विकास विद्यालय अ-हेरनवरगांव येथे अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी - २५/१२/२४ ब्रम्हपुरी तालुक्यातील विकास एज्युकेशन सोसायटी,अ-हेरनवरगांव द्वारा संचालित विकास विद्यालय अ-हेरनवरगांव येथे अपूर्व विज्ञान मेळावा व स्काऊट गाईड युनिट तर्फे आनंद मेळावा खरी कमाई उपक्रम आयोजित करण्यात आला.
या अपूर्व विज्ञान मेळावा व स्काऊट गाईड तर्फे आयोजित आनंद मिळावे याचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम बी धोटे सर यांनी विद्यालयातील उपस्थित शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत केले.अपूर्व विज्ञान मेळाव्यात विद्यार्थांनी व बाल वैज्ञानिकांनी प्रयोग व प्रतिकृती सादर केल्या. वरील उपक्रमामुळे विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व्यवहार ज्ञान व्रृधिंगत होण्यास चालना मिळाली.
स्काऊट गाईड युनिट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आनंद मिळाव्यात विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या खाद्यपदार्थाचे टाल्स लावून विक्रीसाठी खुले ठेवले.विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीनुसार खाद्यपदार्थ घेऊन त्यांचा आस्वाद घेतला.खाद्यपदार्थ विक्रीतून झालेले रुपये,नफा विद्यार्थ्यांना हीच आपली खरी कमाई असते हे समजावून सांगितले.कार्यक्रमाचे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, विद्यार्थी यांनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.