मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची मोटर सायकलला धडक : विद्युत कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू.
★ गौण खनिज उत्खनन चोरीच्या मार्गाने अवैध रेती उत्खनन सुरू प्रशासन सुस्त.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,२७/१२/२४ कालेता येथील खदानी वरून मुरूम भरलेला ट्रॅक्टर ब्रह्मपुरीच्या दिशेने येत असतांना तर ब्रह्मपुरी येथून आपल्या मोटार सायकलने ड्युटीवर जात असलेल्या विद्युत कर्मचाऱ्यांला भरधाव वेगात मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने विद्युत कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना दिनांक,26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान कालेता ते चांदली रस्त्यावर दोन्ही गावाच्या मधोमध घडली.भूषण मनोहर वाढई वय,34 वर्ष असे मृतक विद्युत कर्मचाऱ्यांचे नाव असून तो सिन्देवाही तालुक्यातील सरडपार गावातील रहिवासी होता.भूषण हा ब्रह्मपुरी वीज वितरण विभागात नोकरीवर काही महिन्यापूर्वीच रुजू झाला होता.
विद्युत कर्मचारी भूषण वाढई यांच्याकडे कालेता,चांदली,उचली आणि लाखापूर या गावांचा प्रभार असल्यामुळे आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे मोटार सायकल क्रमांक.MH.34 F 7062 क्रमांकाच्या मोटर सायकलने कालेता - चांदली मार्गाने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या
पावर ट्रॅक कंपनी च्या निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH.34 BR 8547 ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने मुरूम भरून भरधाव वेगात येत असतांना अचानक विद्युत कर्मचाऱ्यांच्या धडक दिल्याने मोटार सायकल चालक भूषण वाढई वय,34 वर्ष हा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. भ्रमणध्वनी वरून घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. घडलेल्या घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह सवविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
विशेष म्हणजे ? ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या महिना भरापासून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन, चोरीच्या मार्गाने अवैध रेती उत्खनन सुरू असून ट्रॅक्टरने भरधाव वेगाने ट्रॅक्टर दिवस - रात्र वाहतूक केली जात आहे.
या अगोदरच गेल्या आठवड्या भरापूर्वीच मौशी येथे मंडई निमित्त गेलेल्या आणि सौचाश बसलेल्या तुलानमाल येथील एका व्यक्तीचा भरधाव वेगात चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा दुसऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांच्या मोटार सायकलला दुसऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने त्याचा सुद्धा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे महसूल विभाग( राजस्व) व पोलीस विभागाने बघ्याची भूमिका तर घेतली नाही ना! असे बोलले जात असून संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून संबंधित विभाग अवैद्य वाहतुकीवर आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याचे घडणाऱ्या घटनेवरून दिसून येत आहे.
पोलिसांनी ट्रॅक्टर चालक आरोपी पुरुषोत्तम दुपारे वय, 45 वर्ष राहणार दूधवाही याला ताब्यात घेतले आहे.तर ट्रॅक्टर मालक रमेश कांबळे राह, नांदगाव जाणी याच्यावर पोलीस विभाग कोणती कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घटनेच्या पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.