पुढील सर्व निवडणूका भयमुक्त,निष्पक्षपाती,संविधान व लोकशाहीचे रक्षण होईल अशा पद्धतीने घ्याव्या.
★ मुल तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत निवडणूक आयोगाला निवेदन ; राष्ट्रीय मतदार दिनी अभिनव उपक्रम.
राजेंद्र वाढई : उपसंपादक
मुल : दिनांक २५ जानेवारी हा 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणा विरोधात जनजागृती करीत निष्पक्ष,भयमुक्तपणे पुढील निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी १२-३० वाजता मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे यांच्या मार्फत आयुक्त भारत निर्वाचन आयोग यांना निवेदन देण्यात आले.
आणि निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण करावे मतदार हा राजा असतो मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहिल याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे. अशी मागणी मुल तालुका काँग्रेस कमिटीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या मार्फतीने करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा महासचिव व सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राकेश रत्नावार, माजी नगराध्यक्ष विजय चींमड्यालवार, जिल्हा महासचिव तथा संचालक घनश्याम येनुरकर, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, ग्रामीण कांग्रेस नेते राजू पाटील मारकवार
युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार,आदर्श खरेदी विक्री सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुरसे, बाजार समिती माजी संचालक डॉ.पद्माकर लेनगुरे, संचालक हसन वाढई, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष राजेंद्र वाढई, माजी नगर सेवक बाबा अझीम, ज्येष्ठ कांग्रेस पदाधिकारी बंडू गुरनुले, गंगाधर घुगरे, युवक उपाध्यक्ष सुरेश फुलझेले
राजोली सोसायटीचे संचालक श्याम पुठ्ठावार, विलास कागदेलवार, जनार्दन भुरसे, महिला काँग्रेसच्या जिल्हा महासचिव शामल बेलसरे, वैशाली घुगरे, संदीप वाढई, यांचेसह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.