अनेक वर्षे पक्षासोबत प्रामाणिक राहूनही उमेदवारी नाकारल्याने संतप्त कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड.
एस.के.24 तास
नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांचा रागाचा बांध अखेर फुटला. अनेक वर्षे पक्षासोबत प्रामाणिक राहूनही उमेदवारी नाकारल्याने संतप्त कार्यकर्ते उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. कुठे नेत्यांच्या घरावर मोर्चा तर कुठे पक्ष सोडण्याची धमकी दिली जात आहे.
काही ठिकाणचे कार्यकर्ते उमेदवारी नाकारल्यामुळे पक्षकार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देत आहेत. त्यामुळे नेत्यासमोरही अडचण निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाच्या एका कार्यकर्त्याने चक्क कार्यालयामध्ये तोडफोड केली आहे. यामध्ये कार्यालयातील मालमत्तेचे प्रचंड हानी झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेशपेठ येथे कार्यालय आहे. याठिकाणी उमेदवारी दिली जात आहे. यासाठी बाहेरील प्रभारीही आले आहेत. यावेळी अविनाश मार्डिकर या कार्याकर्त्याला पक्षाने उमेदवारी नाकारली असता त्याने संतप्त होत सामानाची तोडफोड केली.यावेळी एक संगणक आणि खिडक्यांची काचेही तुटली.यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. कार्यकर्त्यांचा समज काढण्यास राष्ट्रवादी कमी पडत असल्याचीही चर्चा आहे.

