गोंडपिपरी तालुक्यातील मौजा वढोली जवळ 6 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू ; 3 जण जखमी.

गोंडपिपरी तालुक्यातील मौजा वढोली जवळ 6 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू ; 3 जण जखमी.


एस.के.24 तास


गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील मौजा वढोली जवळ रविवार 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. अज्ञात वाहन चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.असून तिचे आई - वडील व लहान बहिण जखमी झाले आहेत.


सोमनपल्ली येथील रहिवासी विपुल पंढरिनाथ नागापुरे हे पत्नी निता नागापुरे, मोठी मुलगी आयुषी वय,6 वर्ष व लहान मुलगी परी वय,3 वर्ष यांच्यासह TVS Radeon क्रं.MH.34 BT  5416 या मोटार सायकलने गोंडपिपरी मार्गे मौजा चेकफुटाना ता.पोंभुर्णा येथे जात होते. 


दुपारी 12:00.वाजता च्या सुमारास, जगदंबा प्रशासकीय महाविद्यालय,मौजा वढोली जवळ मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली.या धडकेत संपूर्ण कुटुंब रस्त्यावर कोसळले.


गंभीर जखमी झालेल्या आयुषी हिला तात्काळ गोंडपिपरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.अपघातात विपुल नागापुरे व त्यांची पत्नी निता हे बेशुद्ध झाले असून लहान मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.


या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोलीसांनी कलम २८१, १०६(१) बीएनएस सह १८४ मोटरवाहन अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास गोंडपिपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाचा शोध घेतला जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !