जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,जुनासुर्ला येथील कुरमार समाजतील मेंढपाळाचा मुलगा बनला MPSC टॅक्स असिस्टंट.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,जुनासुर्ला येथील कुरमार समाजतील मेंढपाळाचा मुलगा बनला MPSC टॅक्स असिस्टंट.


एस.के.24 तास


मुल : जुनासुर्ला येथील आमचे ज्येष्ठ बंधू श्री मुखरुजी रामाजी पाटेवार ( मेंढपाळ ) यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुनील रेखाबाई मुखरुजी पाटेवार  हे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग  MPSC परीक्षेत 6 वे रँक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.                                   


सुनील चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनासुर्ला येथे तर  दहावीपर्यंतचे शिक्षण श्रीमती, इंदिरा गांधी हायस्कूल जुनासुर्ला येथे झाले. त्यानंतर पदवीचे शिक्षण वाणिज्य शाखेत सरदार पटेल महाविद्यालय गंजवार्ड चंद्रपूर येथून पूर्ण करून थेट स्पर्धा परीक्षेकडे वळले.       


स्पर्धा परीक्षा देत असताना कित्येक वेळ त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. परंतु म्हणतात ना, संघर्ष हेच जीवनाची पहिली  यशस्वी पायरी असते. अपयशामध्येच यशाची यशस्वी बीजे पेरलेली असतात. यावर त्याचे ठाम विश्वास होते. त्यामुळे तो आपल्या ध्येयापासून यत्कींचित ही डळमळला नाही.जुलै 2024 मध्ये MPSC  PSI परीक्षेत 99 टक्के यशस्वी होऊन सुद्धा 1 टक्का अपयश येऊन PSI होण्याचे  स्वप्न भंगले. परंतु त्यांने काही  MPSC होण्याचे जिद्द सोडलेले नव्हते.         


Conflict is the first step of success,  या म्हणी प्रमाणे त्याने सतत पाच ते सहा वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी केली. जीवन म्हटल्यानंतर चढउतार यायचे त्याचप्रमाणे त्याच्या स्पर्धा परीक्षेच्या जीवनात सुद्धा अनेक चढउतार त्याने अनुभवले. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वतःचे असे एक वेळापत्रक बनवले. 


जिद्द चिकाटी,मेहनत,नियोजन, संयम आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन या गोष्टीला प्राधान्य देऊन त्याने हे यश मिळवलेले आहे. कुरमार समाजातून जुनासुर्ला येथिल आजपर्यंत दोन व्यक्ती MPSC स्पर्धा परीक्षा पास झालेले आहेत. हे युवकांसाठी प्रेरणादायी आहे. याबद्दल सुनील आणि त्यांच्या कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !