गडचिरोली येथे 20 एप्रिल ला संविधान अधिकार सम्मेलन ;अँड.डॉ.सुरेश माने उपस्थित राहणार.

गडचिरोली येथे 20 एप्रिल ला संविधान अधिकार सम्मेलन ;अँड.डॉ.सुरेश माने उपस्थित राहणार.


एस.के.24 तास 


गडचिरोली: डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती तथा भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने दि.20 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता गडचिरोली येथील इंदिरा चौकात भव्य संविधान अधिकार सम्मेलन आयोजित करण्यात आले आहे.


पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिध्द संविधान तज्ञ अँड.डॉ.सुरेश माने हे या सम्मेलनाला प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणुन उपस्थित राहणार असुन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, आदिवासी कार्यकर्ते प्रा.अनिल होळी हे विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. 

 

या मेळाव्या दरम्यान प्रसिध्द भिमशाहीर अरूणभाऊ सहारे यांचा आवाज परिवर्तनाचा हा प्रबोधनपर संगीतमय कार्यक्रम सुध्दा होणार आहे.या मेळाव्याला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विद्या कांबळे व अन्य पदाधिका-यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !