ने.हि.महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : बुध्दवंदना व वैचारिक मंथन.
अमरदीप लोखंडे : सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१७/०४/२५ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ डी एच गहाणे,उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले.यानंतर ग्रंथालयातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन बुध्दवंदना घेण्यात आली.
उपस्थित सर्वांनी पुष्प वाहून अभिवादन केले.यावेळी डॉ राजेंद्र डांगे , डॉ रेखा मेश्राम, डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर, अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ मोहन कापगते, डॉ रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम डॉ किशोर नाकतोडे, डॉ अरविंद मुंगोले, डॉ पद्माकर वानखडे, डॉ मिलिंद पठाडे,डॉ विवेक नागभिकर, डॉ अतुल येरपुडे , पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, डॉ दुपारे, सुषमा राऊत,दत्तू भागडकर, निनावे, घनश्याम नागपुरे इत्यादी मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
यशस्वीतेसाठी समिती अध्यक्ष डॉ.कुलजित शर्मा,डॉ धनराज खानोरकर,डॉ.युवराज मेश्राम,प्रा.धिरज आतला यांनी सहकार्य केले.