शिक्षकांनी चुकीचे प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचे आढळून आल्यास सबंधित शिक्षकावर कारवाई केली जाणार. 🔰दिशाभूल करणारी प्रमाणपत्रे सादर करणार्‍या शिक्षकामध्ये खळबळ.

शिक्षकांनी चुकीचे प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचे आढळून आल्यास सबंधित शिक्षकावर कारवाई केली जाणार.


🔰दिशाभूल करणारी प्रमाणपत्रे सादर करणार्‍या शिक्षकामध्ये खळबळ.


एस.के.24 तास 


गडचिरोली : जिल्हा परीषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी विशेष शिक्षक संवर्ग भाग - १ मधून बदली करण्यासाठी शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी होणार आहे.ज्या शिक्षकांनी चुकीचे प्रमाणपत्र सादर करून  प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचे आढळून आल्यास सबंधित शिक्षकावर कारवाई केली जाणार आहे.यामुळे दिशाभूल करणारी प्रमाणपत्रे सादर करणार्‍या शिक्षकामध्ये खळबळ माजली आहे.


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे सुधारित धोरण १८ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे.या  शासन निर्णयातील व्याख्या १.८ मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणजे विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक परित्यक्ता,घटस्फोटीत महिला शिक्षक,५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक,विधवा, कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार शासन निर्णयामध्ये नमुद गंभीर आजाराने ग्रस्त आहेत.


अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र विशेष संवर्ग-१ मधून विविध आजारांची व दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करुन बदलीनधून सूट मिळविणार्‍या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

तसेच काही न्यायालयीन प्रकरणांमध्ये जिल्हांतर्गत बदलीमध्ये विविध संवर्ग निर्माण करुन अशा शिक्षकांना बदलीपासून का वगळण्यात आले आहे, याबाबत खुलासा सादर करण्याबाबत शासनास आदेशित केले आहे.


यामुळे शासनाने या संदर्भात स्पष्टीकरण दिले असून  सबंधितांचे प्रमाणपत्र तपासणीचे आदेश दिले आहेत. विशेष संवर्ग-१ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकाने सादर केलेले दिव्यांगत्वाबाबतचे ऑनलाईन युडी-आयडी प्रमाणपत्राबाबत नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीस सदर शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत काही साशंकता आढळून आल्यास,संबंधित शिक्षकाची जिल्हा शल्य चिकीत्सकांकडून तपासणी करुन घेण्यात यावी. 

दिव्यांगत्वाबाबतचे देण्यात आलेले प्रमाणपत्र हे दिव्यांगत्वाचे लाभ अनुज्ञेय करण्याकरीता दिव्यांग कल्याण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दिलेले असले पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

विविध आजारांबाबत सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये अनियमितता आढळून आल्यास,अशा शिक्षकांची देखील जिल्हा शल्य चिकीत्सकांमार्फत फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिव्यांग व वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये व घटस्फोटाच्या आदेशामध्ये तसेच परितत्तकया असल्याबाबतच्या स्वयंघोषणापत्रामध्ये काही अनियमितता केल्याचे आढळून आल्यास,अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच संबंधित शिक्षकाचे निलंबन करुन शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.




#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !