माजी सभापती रामलाल दोनाडकर यांच्या कार्य तत्परतेने गांगलवाडी - आवळगांव मार्ग पुर्ववत सुरू.

माजी सभापती रामलाल दोनाडकर यांच्या कार्य तत्परतेने गांगलवाडी - आवळगांव मार्ग पुर्ववत सुरू.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.

 

ब्रम्हपुरी : तालुक्यात  काल झालेल्या पावसामुळे गांगालवाडी आवळगाव मार्गावरील असलेल्या नाल्याजवळील रामभाऊ दुनाडकर यांच्या शेतात जवळ फार मोठे हिवरा जातीचे वृक्ष सायंकाळी अंदाजे ६ वा.कोलमडून पडल होत.त्यामुळे सुमारे रात्रो एक वाजेपासून या मार्गावर रहदारी करणारे मोठी वाहणे खोळंबलेली होती.पूर्ण रहदारी बंद झालेली होती. 


माजी सभापती रामलाल महादेव हे आपल्या शेताकडे जाण्यास निघाले असता रोडवर ट्रकच्या रांगा तसेच एसटी महामंडळाची बस,छोटी मोठी वाहने थांबलेली दिसली.भले मोठे "हिवराचे"झाड पावसामुळे पडल्यामुळे रहदारी खंडित झालेली होती.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री चहांदे साहेबांना याबाबत माहिती दिली.  


क्षणाचाही विलंब न करता पीडब्ल्यूडीचे  नितीन कोहळी यांना घटनास्थळी पाठविले.नितीन कोहळे यांनी आवश्यक मजुरांची पूर्तता करून अवघ्या काही अवधीत मार्ग मोकळा करुन दिला.


श्री चहांदे साहेबांच्या कार्यतत्परतेने आणि नितीन कोहळे यांनी वेळीच केलेल्या कार्यामुळे अवघ्या काही अवधीत मार्ग मोकळा होऊन प्रवासी बांधवांना दिलासा मिळाला.अवघ्या काही वेळात पीडब्ल्यूडीने केलेल्या कार्याचे माजी सभापती प्रा.रामलाल महादेव दोनाडकर यांनी कौतुक करून आभार मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !