अ-हेरनवरगांव ते आवळी नदी घाट रस्त्यातील कलवट पाईप फुटल्यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,२४/०७/२५ तालुक्यातील अ-हेरनवरगांव ते आवळी नदी घाट जाणाऱ्या रस्त्यातील ईश्वर कुथे यांच्या शेताजवळ असलेल्या कलवटचा पाईप फुटला असल्यामुळे रोवण्याच्या हंगामा करिता शेतात चिखल करण्याकरता बैल बंडी, ट्रॅक्टर नेणे खूपच अवघड झाले आहे.त्यामुळे धानाच्या रोवणी अभावी शेती पडून राहते की,काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
सध्या धानोरवणीचा हंगाम सुरू आहे अशातच हे पाईप फुटण्याचे विघ्न.तरी संबंधित बांधकाम विभागाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन लवकरात लवकर अ-हेरनवरगांव ते आवळी रस्त्यातील तुटलेला कलवट पाईप नवीन टाकून देऊन शेतकऱ्यांना शेतीचा हंगाम करण्याकरिता बैल बंडी,ट्रॅक्टर जाने- येणे करण्याकरिता मार्ग सोयीचा करून द्यावे अशी अ-हेरनवरगांव येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.