पुनर्वसीत असोला चक व सावंगी दीक्षित यांच्या मागण्यांना केराची टोपली. 📍तहसीलदार व पुनर्वसित अधिकारी यांना शाळेच्या आवारात संतप्त नागरिकांनी ठेवले डांबून.

पुनर्वसीत असोला चक व सावंगी दीक्षित यांच्या मागण्यांना केराची टोपली.


📍तहसीलदार व पुनर्वसित अधिकारी यांना शाळेच्या आवारात संतप्त नागरिकांनी ठेवले डांबून.


 एस.के.24 तास


सावली : (सुजीत भसारकर,पाथरी) सावली तालुक्यातील असोला चक व सावंगी दीक्षित ही गावे असोला मेंढा या इंग्रज कालीन तलावाच्या बाधित क्षेत्रात येत असल्याने सदर गावाचे पुनर्वसन सावली तालुक्यातील सायमारा येथे होत असून सदर गावाचे पुनर्वसन अगदी संथ गतीने होत असून अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे येथील नागरिकांनी तहसील कार्यालय सावलीच्या समोर उपोषण करण्याचे इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला होता त्या अनुषंगाने शुक्रवार रोजी तहसीलदार मॅडम प्रांजली चिरडे, अजय चरडे, उपविभागीय अधिकारी मुल.पुनर्वसन अधिकाऱ्यांनी आसोला मेंढा गावाला भेट दिली.


असता काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते त्यामध्ये संतप्त नागरिकांनी आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही म्हणत शाळेच्या आवारातील मुख्य गेटला नागरिकांनी टाळा ठोकून काही काळ अधिकाऱ्यांना डांबून ठेवले होते. यामुळे संतप्त जमावाच्या रोज बघता अधिकारींनी सगळ्या गोष्टीची पूर्तता करून आम्ही आपणास सोमवार पर्यंत यांची माहिती देण्याचे कबूल केले.


यामध्ये पुनर्वसित गावाच्या म्हणण्यानुसार भूखंड घेते वेळी तेथील लोकांनी नकार दिला होता परंतु उपस्थित असलेले अधिकारी कर्मचारी यांनी आता भूखंड न घेतल्यास तुमच्या घरी जाऊन सातबारा देण्यात येईल असे दबाव टाकण्यात आले तेव्हाच पंधरा दिवसात अनुदान देण्यात येईल.


असे सांगण्यात आले होते मात्र आता एक ते तीन हप्त्यात घर बांधल्यावर अनुदान देण्यात येईल असे तोंडी आश्वासन देण्यात येत असून पुनर्वसित गावाची फसवणूक करीत असल्याचे येथील नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे आरोप नागरिक करीत आहेत तसेच 


1)वयोवृद्ध पुरुषांना 8 लाख 76 हजार रुपये अनुदान देण्यात यावा.

2) विवाहित पुरुषांना 8 लाख 76 हजार रुपये देण्यात यावे.

3) प्रत्येक कुटुंबांना पुनर्वसित प्रमाणपत्र देण्यात यावे.

4) 18 वर्षावरील मुला/ मुलींना अनुदान देण्यात यावा.

5) प्रत्येक कुटुंबांना एक हेक्टर जमीन देण्यात यावी.

6) उर्वरित शेती घेण्यात यावी. 

7)2018ते 2025 पर्यंतच्या जी.आर. देण्यात यावा.

8) घराची किंमत ही 5 पट देण्यात यावी व काही लाभार्थी सुटले असतील त्यांनाही यात समाविष्ट करून घेण्यात यावे.


 अशा मागण्या पुनर्वसित नागरिकांच्या असल्याने या मागण्यांच्या पाठपुरावा करून लवकरात लवकर न्याय देण्याचे करू असे आश्वासन अधिकाऱ्याकडून देण्यात आले असल्याने तेथील नागरिकांनी डांबून ठेवलेल्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आले व आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही पुनर्वासित नागरिक तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसण्याच्या इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !