ग्राम पंचायत सोनेगाव येथे हेल्थ कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
चंद्रपूर : धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल मल्टिपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा अंतुर्ला येथे किशोरवयीन मुली व महिलांसाठी हेल्थ कार्ड वाटप कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे आयोजन धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे मुख्य महाप्रबंधक श्री. देवेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गावातील आशावर्कर अर्चना उकीनकर अंगणवाडी सेविका कविता सूर,अर्चना वराटे तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत सुमारे ४० किशोरवयीन मुली व महिलांना हेल्थ कार्ड वितरित करण्यात आले. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळवून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दिनेश कामतवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा वानखेडे, माधुरी श्रीवास्तव,दीप्ती काकडे,सुषमा सातपुते यांनी विशेष मेहनत घेतली.