संतोषसिंह रावत यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कॅमेटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कॅमेटीचे प्रदेश्याध्यक्ष काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला बदलवावे लागले.अखिल भारतीय काँग्रेस कॅमेटीचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्या निर्देश्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कॅमेटीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळयात पडली.
मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कॅमेटीचे उर्वरित संघटनात्मक फेरबदल करण्यात आले नव्हते.आगामी दोन तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत.त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये नव्याने रखडलेल्या नियुक्या करण्यात आलेल्या आहेत.काही जिल्ह्यात पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणच्या जिल्हाध्यक्षांची सुद्धा निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कॅमेटीचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे नेते श्री राहुल गांधी यांच्या निर्देश्यानुसार काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव श्री के.सी. वेणुगोपाल यांनी दिनाक २९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कॅमेटीमध्ये फेरबदल करून नव्याने नवीन नियुक्त्या करून कार्यकारिणी घोषित केली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँगेसच्या नव्या कार्यकारिणी मध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष सिंह रावत यांची महाराष्ट्र प्रदेश काँगेस कॅमेटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.संतोषसिंह रावत जमिनीवर काम करणारे आणि कार्यकर्त्यांशी नाळ जुळून घेणारे नेते आहेत.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोळामुळे त्यांची विधानसभेत जाण्याची संधी हुकली.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम रित्या जबाबदारी सांभाळून बँकेला मोठा नफा मिळवून दिला.
तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे काम संपुर्ण जिल्हात आहेत.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांना चंद्रपूर जिल्हयाचा राजकीय,सहकार क्षेत्र,सामाजिक,कृषी,तसेच जनतेच्या समस्या आदींची उत्तम जाणकारी आहे.
संतोषसिंह रावत यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कॅमेटीवर सरचिटणीस पदी झालेल्या नियुक्तीने काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले दिवस येतील असे जनतेकडून म्हटले जात आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल आमदार विजय वडेट्टीवार,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कॅमेटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे,खासदार प्रतिभाताई धानोरकर,करीमभाई शेख,देवेंद्र आर्या,घनश्याम मूनचंदानी,राकेश रत्नावार,गुरू गुरूनुले,गौतम गेडाम,पवन निलमवार,प्रशांत उराडे,रुपल रावत आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.