ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा पिंपळगाव (भोसले) येथील शेतकऱ्यांची विहीर पुरामुळे विहीर खचली,मोका चौकशी करून भरपाई देण्याची मागणी.

ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा पिंपळगाव (भोसले) येथील शेतकऱ्यांची विहीर पुरामुळे विहीर खचली,मोका चौकशी करून भरपाई देण्याची मागणी. 


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : पिंपळगाव (भोसले) लगत वैनगंगा नदीला लागून अनेक शेतकऱ्यांची स्वतःच्या मालकीची जमीन आहे. सन 2019. गोसीखुर्द धरणातून.वारंवार पाणी सोडल्यामुळे शेती मध्ये नदीतील पाणी मोठया प्रमाणात आल्याने शेतीतील विहीर पाण्याच्या प्रवाहने खचून वाहून गेल्याने 2019 पासून कमीत कमी 50 ते 60 एकर जमीन नदी पात्रामध्ये गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.


शेतकऱ्यांच्या विहिरी सुद्धा नदी पात्रामध्ये गेले.यावर्षी सुद्धा सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणातून पाणी सोडल्याने श्री.शरद वामन शेबे यांच्या स्वमालिकेची २ हेक्टरच्या वरून आत्ता पर्यंत नदी पात्रामध्ये गेले.शेतकरी अपंग असून अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला.या क्षेत्रातील आमदार यांच्याकडे सुद्धा मागणी केली परंतु कोणतीही मोका चौकशी न होता त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही.


 सातबारा असून जमीन नाही अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची झाली याच वर्षी दोन विहिरी नदी पात्रामध्ये गेले संबंधित तलाठी ब्रह्मपुरी येथील संबंधित तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले परंतु कोणतीही मोका चौकशी केली नाही व त्यांना मोबदला मिळाला नाही. 


आमच्या शेतकऱ्याची एकच मागणी आहे की लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना विहिरीचा व पिका सहित जमीन नदीपात्रामध्ये गेली त्यांचा सुद्धा मोबदला देण्यात यावा अन्यथा.तहसील कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !