लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त व्याख्यानाचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : येथील लोकमान्य टिळक वाचनालयात १ऑगष्ट रोजी शुक्रवारला सायंकाळी ६-०० वाजता लोकमान्य टिळक पुण्यतिथी समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या समारोहाल जेष्ठ संपादक श्रीपाद अपराजित लोकमान्य टिळकांचे व्यक्तीमत्व व साहित्य या विषयावर व्याख्यान देतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालये अध्यक्ष मा. प्राचार्य सतिशराव शिनखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव मा. भार्गवदत्त कात्यायन उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.